कार्यकारी अभियंता कार्यालयात महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्व. लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयात साजरी करण्यात आली. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आणि उपअभियंता विनायक जोशी यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कणकवली तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, पत्रकार दर्शन सावंत, पिडब्ल्यूडी कार्यालयातील लेखापाल लवू किंजवडेकर, माईनकर, चालक शैलेश कांबळे यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!