कणकवली (प्रतिनिधी): श्रीगणेश माँटेसरी प्ले स्कूल कलमठ तांबे भवन येथे महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली होती. या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी उज्वला धानजी उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे सुंगधा देवरुखकर उपस्थित होत्या. 2आँक्टोबर गांधी जयंती निमित्त घोषवाक्य पाठांतरांचा उपक्रम सातत्याने 20वर्ष राबविले जात आहे , हे 21वर्ष होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शर्वरी अखिल आजगावकर मँडमनी खुप छान केलं. तसेच धानजी यांनी गांधीजी, आणि लालबहादूर शास्त्री बदल आपले मनोगत व्यक्त केले. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कै. भालचंद्र माणगांवकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री जीवन माणगावकर कडून तसेच कै. रमाकांत राणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऋत्विज राणे यांच्या बक्षिसे देण्यात आली. सर्व मुलांचे कौतुक करून उपस्थित पालकांचे आभार मानण्यात आले.
श्रीगणेश मॉंटेसरी प्ले स्कुल मध्ये महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी











