कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई 136 तालुका शाखा कणकवली तालुका कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष पदी वैभव धुमाळे,उपाध्यक्षपदी शशिकांत तांबे,महिला उपाध्यक्षपदी अर्चना लाड – सचिवपदी वैभव ठाकूर,कोषाध्यक्षपदी संजय कवटकर यांची निवड करण्यात आली.अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे नितीन भाट-सहसचिव,सिद्धेश गोसावी-संघटक,तृप्ती पेडणेकर,विशाल वरवडेकर अशी नूतन कार्यकारिणी निवड झाली.यावेळी राजेंद्र सावंत,दीपक तेंडुलकर माजी अध्यक्ष आणि सचिव यांचा उत्कृष्ट कामासाठी सत्कार करण्यात आला.तसेच नूतन कार्यकारिणी चा सत्कार कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,सहाय्यक गटविकास अधिकारी सूर्यकांत वारंग तसेच इतर मान्यवर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कणकवली तालुका ग्रामसेवक युनियन अध्यक्षपदी वैभव धुमाळे, सचिवपदी वैभव ठाकूर यांची निवड











