मालवण (प्रतिनिधी): येथील काजू फॅक्टरीमधील कामगार प्रशांत | तुकाराम पेडणेकर (वय- ५४ रा. वरची तोंडवळी यांचा. हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. काजू फॅक्टरीमध्ये प्रशांत पेडणेकर ज्यांच्या छातीत अचानक दुखु लागले. त्यामुळे त्यांना येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रूग्णालय प्रशासनाने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पोलीस कर्मचारी हेमंत पेडणेकर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
कॅश्यू फॅक्टरीत कामगाराचा हार्ट अटॅक ने मृत्यू











