जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या निवड चाचणीवर कबड्डीपटूंचा बहिष्कार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या सर्व स्पर्धांवर तसेच नव्याने किशोर कुमार जिल्हा निवड चाचणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय कबड्डीपटूंनी एकमताने घेतला आहे.आजी-माजी कब्बडी खेळाडू संघटनांनीही जिल्हातील फेडरेशनच्या स्पर्धा होऊ न देण्याचा इशारा दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कबड्डीपटू व आयोजक यांना विश्वासात न घेता शिवाय सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनच्या पदाधिकारी यांच्याकडून कबड्डीपटूंवर सतत होणारा अन्याय याबाबत रविवारी जिल्ह्यातील अठरा मंडळाचे खेळाडू,व्यवस्थापक, कबड्डी प्रेमी चौंडेश्वरी मंदिर कणकवली येथे एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करत जिल्ह्यातील फेडरेशनच्या वतीने घेण्यात येणा-या स्पर्धा न खेळण्याचा एकमताने निर्णय घेतला.

यावेळी पंचक्रोशी फोंडाघाट,जय महाराष्ट्र सावंतवाडी,शिवभवानी सावंतवाडी,सिंधुपुत्र कोळोशी,यंगस्टार कणकवली, ARM कणकवली. लक्ष्मीनारायण वालावल,शुभम स्पोर्ट्स देवगड, संघर्ष कोचरा, रवळनाथ रानबांबूळी,जय शिवारा कणकवली, गरुडझेप.कणकवली बॉईज. जय मल्हार फोंडा, याक्षणी माणगाव,जय भवानी नेरूळ,गांधयाळे,विजय प्रतिष्ठान सावंतवाडी,दिर्बादेवी पाटकरवाडी देवगड,दिप वॉरियर्स सावंतवाडी,जय गणेश पिंगुळी,कलेश्वर नेरूळ मंडळांचे प्रतिनिधी,आयोजक, कबड्डी प्रेमी, खेळाडू आदी उपस्थित होते.यावेळी एकमताने वरील निर्णय घेण्यात आला.

error: Content is protected !!