माजी आ. प्रमोद जठार यांच्या हस्ते सरपंच गौरी वंजारे यांनी स्वीकारला पुरस्कार
कणकवली (प्रतिनिधी): राज्यसरकार पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेंतर्गत कणकवली तालुक्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शिरवल ग्रामपंचायतचा महा आवास अभियान पुरस्कार 2021-22 देऊन सन्मान करण्यात आला.माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते आमदार नितेश राणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, माजी पं स सभापती मनोज रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरवल सरपंच गौरी वंजारे यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रवीण तांबे , ग्रामसेवक वर्षा कदम आदी उपस्थित होते.