खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व सचिव महेश कोळसूलकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
कणकवली तालुका स्तरीय विविध क्रीडा स्पर्धामध्ये खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे यश संपादन केले.गोळा फेक – प्रकारात .इयत्ता ८ वी तील कु.शमिका कानडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर कु.श्रावणी कानडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. १०० मीटर धावणे – या क्रीडा प्रकारात इयत्ता ८वी तील आर्यन जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला ४००मीटर धावणे – या क्रीडा प्रकारात कु.युवराज खांडेकर याने द्वितीय क्रमांक व ४०० मीटर धावणे (मुली) यामध्ये ८ वी तील कु.अनुष्का धुवाळी हिने द्वितीय क्रमांक पटकावला. उंच उडी- प्रकारात इयत्ता ८ वी तील कु. जागृती तावडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला .कु.क्षितिजा लोकरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. तर कु. युवराज खांडेकर यांने द्वितीय क्रमांक पटकावला.
लांब ऊडी- प्रकारात इयत्ता ६ वी तील कुमारी आर्या जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला. ४०० मीटर रीले(मुलगे)- या क्रीडा प्रकारात आर्यन जाधव, आर्यन चिके,मयूरेश दर्पे व युवराज खांडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ४०० मीटर रिले(मुली ) – या क्रीडा प्रकारात कु.संस्कृती गुरव, कु.आर्या जाधव,कू श्रुती जामसंडेकर व कु अनुष्का धुवाळी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.तर १९ वर्षाखालील मुले ४००मीटर धावणे- या क्रीडा प्रकारात किस्मत फारुख पटेल यांने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच १७ वर्षाखालील मुले व मुली – या गटामध्ये तिहेरी उडी या प्रकारात आर्यन गणेश राऊत याने प्रथम क्रमांक पटकावला तर ८०० मीटर धावणे – या प्रकारामध्ये राज विनोद उन्हाळकर याने द्वितीय क्रमांक, लांब उडी- प्रकारामध्ये सुजल किशोर भालेकर याने द्वितीय क्रमांक, १०० मीटर हरडल्स या प्रकारामध्ये कु.त्रिवेणी विशाल परब हिने प्रथम क्रमांक, ३किलोमीटर चालणे- या प्रकारामध्ये समीक्षा विलास मांजरेकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
१९ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये ८०० मीटर धावणे- या प्रकारामध्ये कु.सानिका सुधाकर वारीसे हिने द्वितीय क्रमांक तसेच २०० मीटर धावणे- या प्रकारा मध्ये कु.कावेरी तुकाराम कोंडविलकर या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक ४०० मीटर धावणे- या प्रकारामध्ये कु.सायली तुकाराम पाष्टे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक तर कु.कावेरी तुकाराम कोंडविलकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.तर गोळा फेक – या प्रकारामध्ये कु.रिद्धी संतोष पांचाळ हिने द्वितीय क्रमांक व १०० मीटर हर्डल्स या प्रकारामध्ये कु.श्रुती संतोष साळवी हिने प्रथम क्रमांक पटकावला. १९ वर्षाखालील शंभर ते चारशे मीटर रिले – या प्रकारामध्ये कु.कावेरी तुकाराम कोंडविलकर, कु. श्रुती संतोष साळवी,कु.सानिका सुधाकर वारीसे व कु.सायली तुकाराम पाष्टे या चार विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला.
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धे प्रमाणेच कणकवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सुद्धा खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये १९ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने कणकवली तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १४वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला वरील दोन्ही संघ जिल्हास्तरासाठी पात्र ठरले आहेत.
सदर स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असल्याची खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी दिले.व सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करून पुढील स्पर्धेच्या फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे ,सचिव महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे धुमाळे सहसचिव राजेंद्र वरूणकर उपाध्यक्ष भाऊ राणे प्राचार्य संजय सानप ,पर्यवेक्षक संतोष राऊत , क्रीडा शिक्षक भिसे सर, पाडवी सर,सर्व शिक्षक व क्रीडाप्रेमी यांनी अभिनंदन केले आहे. व पुढील जिल्हास्तरावरील यशासाठी शुभेच्छा दिल्या.


















