देण्यातील आनंद ..या संकल्पनेतून समाजसेवेच्या भावनेची रूजवणूक हाच उद्देश- डाँ.लिली भूषण

केईस श्राँफ काँलेज आँफ आर्टस अँण्ड काँमर्सकडून जा़ँय आँफ गिव्हिंग पंधरवड्याचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : ” देण्या’ मागील आनंदाची” मूळ संकल्पना म्हणजे समाजसेवेच्या भावनेची रुजवणूक करणे हीच आहे. ‘घेण्या ‘तील आनंदापेक्षा ‘ देण्या’तील आनंद खचीतच महत्त्वाचा आहे.”असे भावपूर्ण उदगार के ई एम श्रॉफ महाविद्यालयाच्या डायरेक्टर डॉ.लीली भूषण यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील गरजू व्यक्तीसाठी जॉय ऑफ गीव्हिंग (देण्यातील आनंद) नावाच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले.

एखाद्या कॉलेजमध्ये एन्ट्री केल्या-केल्या मुला-मुलींचे घोळके दिसणे अपेक्षितच आहे , पण कांदिवलीच्या केईएस श्रॉफ कला व वाणिज्य महाविद्यालयात एन्ट्री घेताच समोर तेल, पीठ, हळद, मीठ , बिस्कीटांनी् भरलेले डबे मागील गेले १५ दिवस दिसत होते.ज्या समाजात आपण वाढलो, जगलो, घडलो, त्या समाजाला आपण काही देणे लागतो या भावनेतून गरजूंना मदत करण्यासाठी महाविद्यालयाच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

गरजू कुटुंबांना आणि समाजातील वचिंतांसाठी काम करणाऱ्या संस्थांना सढळ हस्‍ते वस्‍तूरुपी योगदान देऊन महाविद्यालयातील मुलांनी ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ ( देण्यातील आनंद ) नावाचा उपक्रम २९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान महाविद्यालयात राबवला आहे. जे काम दुसर्‍यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवते, ज्या कामाने आपल्या मनाला आनंद मिळतो ते काम कोणत्याही अपेक्षे शिवाय करत राहावे, या हेतूने महाविद्यालयातील ‘सोशल इम्पॅक्ट कमिटी’ (सामाजिक प्रभाव समिती) दरवर्षी ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ पंधरवडा आयोजित करते. ‘जॉय ऑफ गिव्हिंग’च्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांना शक्य होईल तितकी मदत करण्याचे आवाहन केले जाते. आर्थिक मदत शक्य नसल्यास किराणा सामान किंवा इतर गरजेच्या वस्तू देण्याचे आवाहनही केले जाते. पंधरवड्यात या सगळ्या वस्तू एकत्र जमवल्या जातात आणि सर्वांना सोयीचा दिवस बघून ही सगळी मदत वसई आणि विरारमधील अनाथालये व व्रुद्धाश्रमांना , विविध सेवाभावी संस्थांना पोहोचवण्यात येते.

यंदा १२ ऑक्टोबरला महाविद्यालयातून ही मदत पोहोचवणारी गाडी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या टिमसह काँलेजमधून सोडण्यात आली. आज या टिमने वसई आणि विरारमधील विविध अनाथालये व वृध्दाश्रमांसह जीवन आनंद संस्था संचलित विरारफाटा येथील समर्थ आश्रमामधील बांधवांसाठी जीवनोपयोगी साहित्य पोहचविले. जीवन आनंद संस्था समाजातील सर्वात वंचित असलेल्या रस्त्यावरील बेघर, निराधार व वंचित व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी केईएस महाविद्यालय विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या स्तुत्य अशा व समाजातील वंचित हिताच्या या उपक्रमासाठी त्यांचे कौतुक केले असून आभार मानले आहेत.

error: Content is protected !!