सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी व कार्यकर्ता मेळावा संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी व कार्यकर्ता मेळावा नुकताच सावंतवाडी येथे पार पडला. माजी सहकार मंत्री व शरद पवार यांचे खास विश्वासू आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा कार्यकारणीच्या विविध पदांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक चे जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांच्या मान्यतेने जिल्हा युवक सचिव पदी शहाबुद्दीन कासिम बोबडे यांची नियुक्ती झाली. तसे पत्र माननीय बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते बोबडे यांना देण्यात आले. शरद पवार यांचे पुरोगामी विचार तळागाळात पोचवा आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य यापुढे केल जाईल आपण पक्ष वाढीसाठी काम करा अशा शुभेच्छा आमदार पाटील यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.












