सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला ६५ वा वाढदिवस
कणकवली (प्रतिनिधी): विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली आणि रोटरी क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने सीताराम उर्फ दादा दत्तात्रय कुडतरकर यांचा ६५ वा वाढ दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला . दादा कुडतरकर हे मुळातच सेवाभावी वृत्तीने इपाटलेले जीवन जगत असल्यामुळे त्यांनी विद्यामंदिर प्रशालेत आपली आई कै रमाबाई कुडतरकर हिच्या स्मृतीप्रित्यर्थ महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्री जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्याच्या जीवनात वक्तृत्व कलेची आवड निर्माण व्हावी यांसाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यासाठी गांधी चरित्र व लाल बाहादूर शास्री चरित्र यांच्या जीवन कार्याचा परिचय आजच्या पिढीला निर्माण होण्यासाठी दादा कुडतरकर यांनी प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवून वक्तृत्व स्पर्धा प्रशालेत घेतली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. शंभर विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाले आणि संपूर्ण शाळा गांधी व शास्री चरित्राने बहरून गेली. तसेच दादांची शैक्षणिक क्षेत्रातील जाणीव प्रगल्भ असल्यामुळे विद्यामंदिर माध्यामिक प्रशालेला आपल्या अमोल दातृत्वातून माईक सेट व मशिन भेट देवून उपकृत केले . शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळजूं व मुख्याध्यापक पी जे कांबळे सर यांच्याकडे भेट वस्तू सुपूर्त केली . तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेची बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली . गट क्र . १ पहिली ते चौथी प्रथम क्रमांक कु वेदा यशवंत महाडिक . द्वितीय क्रमांक कु रुद्र मनोज सावंत तृतीय क्रमांक देवराज गणपत कडू उत्तेजनार्थ १ ) ओबेद तुषार कदम २ ) आरोही रमेश कदम
गटक्रमांक २
पाचवी ते सातवी
प्रथम क्रमांक कर्तृत्वा विनायक हरकुळकर द्वितीय क्रमांक सारा विध्नेश गोखले तृतीय क्रमांक गौरेश मुकेश काडगे उत्तेजनार्थ १ ) मृणाल महेश पाटील
२ ) गार्गी अविनाश सावंत
गट क्रमांक ३ (आठवी ते दहावी ) प्रथम क्रमांक विधी विरेंद्र चिंदरकर द्वितीय क्रमांक सिद्धी अर्जुन खेडेकर . तृतीय क्रमांक सिध्देश गणेश तांबे . उत्तेजनार्थ १ ) शरयू लक्ष्मण पोतदार २ ) स्वरा अभिजित मिरजकर .. या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला . तसेच दादांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी जीवापाड जपलेला मित्र समूह उपस्थित होते . रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच दादांचे कुटुंबिय पत्नी सौ रंजना कुडतरकर व नातवंडे रोटरीचे अध्यक्ष रवी परब सौ उमा परब मनोहर पालेकर अशोक करंबळेकर . राजेद्र पेडणेकर नॅपचे अनंतराव उजगावकर डॉ पावसकर डॉ . विद्याधर तायशेटे डॉ प्राजक्ता तेली . विरेंद्र नाचणे भेहराम राठोड श्रद्धा कदम पूजा सावंत संदेश तुळसूलकर . I विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळा कणकवली . विद्यामंदिर इंग्लिश स्कूल . विद्यामंदिर प्राथमिक विभाग सर्व शिक्षक वृंद या गौरव समारंभाचे सूचसंचालन शेळके जे . जे . यांनी केले आभार वणवे सर यांनी मानले .











