उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक
कुडाळ (अमोल गोसावी) : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज कुडाळ येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेउन लवकरच होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे , महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर , कुडाळ तालुका प्रमुख योगेश तुळसकर , मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर , कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक लढवतील असा आमचा मानस आहे. या बैठकीत खासदारकीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तर पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील आणि राज्यात आमच्याच महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर खासदारकीचा उमेदवार हा रेस्ट हाऊस किंवा अशा कार्यक्रमात ठरत नसतो, असा टोलाही सामंत यांनी यावेळी बोलताना लगावला.उद्धव ठाकरे यांनी समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केली. भाजप आणि शिंदे गटाला गाडण्यासाठी ही हातमिळवणी केली असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावर पत्रकारांनी विचारले असता, आज पासून नवरात्र सुरू झाली असून नरेंद्र मोदी हे देशाचे पुन्हा पंतप्रधान होतील आणि राज्यात महायुतीचे सरकार येईल.











