कणकवलीकरांची मोफत थाळी ; समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन

हातावर पोट असलेल्या गरजूंना 100 ते 200 जणांना दररोज मिळणार मोफत भोजन

18 ऑक्टोबर रोजी शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : थाळी कष्टकऱ्यांची… पंगत आपलेपणाची त टॅगलाईन खाली हातावर पोट असलेल्या रोजंदारी वर्गासाठी कणकवलीकरांची थाळी हा सामाजिक बांधिलकी च्या जाणिवेतून नवीन उपक्रम सुरू करत असल्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.दिवसाला किमान 100 आणि जास्तीत जास्त 200 गरजूना मोफत जेवण थाळी देण्यात येणार आहे. डाळ भात पुरी भाजी लोणचे असा मेनू असलेले जेवण गरजूंना आर बी बेकरी समोर परवर्धन चौकात दुपारी 1 ते 3 या वेळेत देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ 18 ऑक्टोबर रोजी होणार असून पहिल्या दिवसाचे भोजन राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडून प्रायोजित करण्यात आले आहे.वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तींकडून यासाठी आर्थिक सहाय्य घेण्यात येणार असून 200 थाळीसाठी 10 हजार व 100 थाळीसाठी 5 हजार खर्च होणार आहे. भोजन प्रयोजकाचा बॅनर मोफत भोजन थाळी ठिकाणी लावण्यात येणार आहे.याचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळ करणार आहे. भोजन देणगी साठी राजा पाटकर मोबा.9860380738 ,राजू गव्हाणकर मोबा. 9422584900 पंकज पेडणेकर मोबा. 9890030289 यांच्याशी संपर्क साधावा.यावेळी राजा पाटकर, राजू गव्हाणकर उपस्थित होते.

error: Content is protected !!