विद्यार्थ्याची ८०% शैक्षणिक जबाबदारी संस्था व शाळा घेईल पालकांनी पाल्याची २०% जबाबदारी स्वीकारावी- जयेंद्र रावराणे यांचे आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्था, एम के सी.एल. केंद्र वैभववाडी व पोलीस स्टेशन वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात पालकांसाठी सायबर क्राईम बाबत प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच आभासी सोशल मीडिया व विविध आकर्षक जाहिराती, गेम यापासून परावृत्त केले पाहिजे अभ्यासा व्यतिरिक्त उरलेल्या वेळात तो काय करतो याकडे पालकांनी जाणिवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षण संस्था, शाळा, व शिक्षक म्हणून आम्ही आपल्या पाल्याची अभ्यासात ८०% जबाबदारी घेतो आपण पालक म्हणून २०% पाल्याची जबाबदारी घ्यावी असं आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी उपस्थित पालकांना केले. वर्ग शिक्षक यांच्या माध्यमातून वर्गातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे अनुक्रमे क्रमांक व गुण यांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर वैभववाडी एम के सीएल चे सचिन रावराणे यांनी सायबर क्राईम बाबत फसवणूक कशी केली जाते यावर आधारित एक डेमो व्हिडिओ दाखवण्यात आला. लहान मुलांकडून मोबाईल वर गेम खेळताना होणारी फसवणूक, बॅंक संबंधित फेक मेसेज द्वारे केली जाणरी फसवणूक, मोबाईलचा वाढलेला स्क्रीन टाईम, स्क्रीन टाईम मुळे डोळ्यांवर, आरोग्याधर होणारा परिणाम, सोशल मीडियाचा वाढता वापर, महिला मुलिंना सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे वाढते प्रमाण, झटपट लोन ॲप, सायबर जॉकी, आपला पासवर्ड दुसऱ्या व्यक्तीला न देता तो काही काळानंतर बदलला पाहिजे पासवर्ड हा स्ट्रांग असला पाहिजे, आपले फोटो किंवा वैयक्तिक माहिती कोणाला शेअर करु नये, मोबाईल चा आय एम इ कोड लिहून ठेवला पाहिजे जेणेकरून मोबाईल चोरीला गेल्यास त्यातील डाटाचा चुकीचा वापर टाळता येऊ शकतो, असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी त्यांनी उपस्थित पालकांना केले.
पुर्वी व्यक्तीचा हात पाहून भविष्य सांगीतले जात होते आज व्यक्तीचा मोबाईल पाहून त्याचे भविष्य सांगता येत. पालकांनी आपल्या मुलांच्या सोशल मीडिया ॲप चे पासवर्ड माहीत करून घ्यावे शिवाय पालकांच्या सोशल मीडिया ॲप चा अनेक पाल्य वापर करत असतात त्यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. इच्छे शिवाय प्रगती होत नाही. सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने देखील करता येतो. पाल्याला मोबाईल किंवा इतर गोष्टीची गरज किती आहे हे पाहून त्या गोष्टी पाल्याला पुरविल्या पाहिजेत. आपला ओटीपी कोणालाही शेअर करु नये. तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही वैभववाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमोल पाटील यांनी पालक वर्गाला दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नादकर बी.एस. आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक एस.बी. शिंदे यांनी केले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे,संचालक शरद नारकर,पोलिस निरीक्षक अमोल पाटील व पोलीस सहकारी, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, एम के सी एल चे वैभववाडी प्रमुख सचिन रावराणे, पत्रकार उज्वल नारकर, माता पालक संघाचे तेजस आंबेकर, तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












