खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व दविस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये भारताचे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिना बरोबरच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा उत्साहात घेण्यात आल्या होत्या. यावेळी डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार अविनाश हळबे यांचे व्याख्यान महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले होते. इयत्ता अकरावी व बारावी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे’ हा व्याख्यानाचा विषय होता. यावेळी प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य संजय सानप यांनी केले, तर मान्यवरांचा परिचय आणि आभार प्रदर्शन सहायक शिक्षक सचिन शेट्ये यांनी केले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त ज्युनियर कॉलेज विभागात निबंध स्पर्धा घेण्यात आल्या या निबंध स्पर्धेमध्ये एकूण ८० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यामध्ये नंबर आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे- कु.ॠणाली संतोष जुवाटकर हिने प्रथम क्रमांक, कु.जरीफ हनीफ काझी हिने द्वितीय क्रमांक तर कु.प्रणिता प्रकाश घाडी हिने तृतीय क्रमांक पटकावला.

        तर प्रशालेतील माध्यमिक विभागामध्ये वाचन प्रेरणा दिना निमित्त वाचन स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये विविध गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील क्रमांक पुढील प्रमाणे- इयत्ता पाचवी ते सहावी या गटामध्ये कु.अनुष्का विनोद सुतार हिने प्रथम क्रमांक, रेवण अनंत राऊळ यांनी द्वितीय क्रमांक तर रितेश गोरक्षनाथ गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. इयत्ता सातवी ते आठवी या गटामध्ये कु.अनुष्का अंकुश पतीयान या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक,कु.आर्या विजय गुरव हिने द्वितीय क्रमांक तर कु.तनुश्री लंकेश सौंदळकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. इयत्ता नववी ते दहावी या गटामध्ये कु.श्रेया लवेश तांबे हिने प्रथम क्रमांक,कु.पुनम पवन चांदीलकर हिने द्वितीय क्रमांक तर कु.नीता अतुल सुर्वे हिने तृतीय क्रमांक पटकावला.
       या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव राजेंद्र वरूणकर, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत तसेच इतर सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
error: Content is protected !!