डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे व फर्स्टक्राय संस्था, पुणे यांचा संयुक्त उपक्रम

५० वृध्दांना दिवाळी किरणा किट व ७५ वृध्दांना गरम कपडे वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी): समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे व फर्स्टक्राय संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विश्वासनगर, कुंडाणे आणि आदिवासी वस्ती, मोराणे उपनगर येथील ५० वृध्दांना दिवाळी आनंदाचा सण लक्षात घेऊन ३ महिने पुरेल इतका किराणा किटचे वाटप संस्थेच्या वतीने करण्यात आले. यामध्ये १०किग्रॅ.गहू,३किलो तेल,२किग्रॅ. शेंगदाणे २किलो,चना डाळ १किलो,तूर डाळ १किलो, मटकी २किलो,गूळ २किलो,साखर १ किलो,पोहे १ किलो, रवा अर्धा किलो,खोबरे इत्यादी किराणा किट आदी वस्तूंचा समावेश होता. ७५ वृध्दांना स्वेटर,चादर,चटई व ब्लँकेट्स चे वाटप. – हिवाळ्यात थंडीपासून वृद्धांचा बचाव व उबदार राहण्यासाठी प्रकल्पातील मोराणे उपनगर येथील पारधी वाडा, भिल्ल वस्ती आणि कुंडाणे येथील विश्वासनगर , मातंग वस्ती, नाचक वस्ती, राम मंदिर परिसरातील ७५ वृध्दांना स्वेटर, चादर, चटई व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागातील गरीब आणि गरजू कुटुंबातील निराधार वृद्धांसाठी हा एक उपक्रम आहे. कार्यक्रमप्रसंगी डॉ. जालिंदर अडसुळे (सचिव, समता शिक्षण संस्था, पुणे आणि संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प. धुळे) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. मा. किरण चिंदरकर (प्रतिनिधी, फर्स्टक्राय संस्था, पुणे) हे प्रमुख पाहुणे होते. प्रा. आरती बरिदे (सेवानिवृत्त प्राध्यापक, जय हिंद कॉलेज धुळे) आणि डॉ. प्रा. शोभा शिंदे (सेवानिवृत्त प्राध्यापक व संचालक भाषा अभ्यास व संशोधन केंद्र, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) हे कार्यक्रमात उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. रघुनाथ महाजन (प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे), श्रीमती. सुनंदा निकम (आरोग्य पर्यवेक्षक, जि. प. धुळे), डॉ. प्रिती वाहणे ( सहाय्यक प्राध्यापक, डॉ. बा. आं. समाजकार्य महा, मोराणे) विजय जाधव ( सहाय्यक फौजदार, तालुका पोलीस स्टेशन, धुळे), कैलास झोडगे ( पोलीस पाटील, मोराणे) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रा. रचना अडसुळे (समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प) यांनी सदर कार्यक्रमांचे संयोजन व प्रास्ताविक केले.
प्रकल्पांच्या माध्यमातून वृध्दांना सामाजिक आधार देण्याचा प्रयत्न करतो व वृद्धांचा आरोग्याचा दर्जा उंचवण्यासाठी प्रकल्पाकडून असे उपक्रम गरजेचे आहे असे मा. डॉ. जालिंदर अडसुळे यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणाले. व दिवाळीचा सण जवळ आलेला असून वृद्धांना प्रकल्पाने किराणाचा खजिना दिला आहे असे डॉ. प्रा. शोभा शिंदे हे म्हणाले.
या प्रसंगी सायजाबाई गायकवाड, मायाबाई अमृतसागर, आखाडू गायकवाड, श्रीमती. लीलाबाई भील, इ. वृध्दांनी स्थानिक विविध गाणी गायली. यावेळी प्रा. सुनिता पाटील (कार्यक्रम अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर गणेश उफाडे (कार्यक्रम अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प) यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमात विशाल भदाणे, सुभाष बागुल, सायली कडू, रविंद्र कदम, लक्ष्मण पवार, सुनील ढेगळे, रेखा उफाडे यांचे मोलाचे सहकार्य होते.

error: Content is protected !!