वैभववाडी (प्रतिनिधी): प्रत्येक पक्षात भाडेकरू सारखे राजकीय सोयीनुसार भाडोत्री दिवस काढणाऱ्या काका कुडाळकर यांनी आपलीच राष्ट्रवादी खरी असून अन्य राष्ट्रवादी स्वयंघोषित आहे असे वक्तव्य करुन हसे करून घेण्यापेक्षा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून किती दिवस झाले?राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय नियमांच्या घटनेची कितपत जाण आहे,याचा विचार करूनच राष्ट्रवादी खरी कोणाची आणि स्वयंघोषित कोणाची अशी बेताल वक्तव्य करताना आपले राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वय किती,आणि आपण यापुढे या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची हमी काय? आपण आजपर्यंत अनेक पक्षाच्या संघटनेची चव चाखून मोकळे झालात,खऱ्या राष्ट्रवादीत आपण दोन वेळा प्रवेश करून ५ तारीखला शरद पवार समर्थक म्हणून प्रतिज्ञापत्र भरून दिले आणि ६ तारीखला अजित पवार समर्थक होऊन आता तिसऱ्या अजित पवार गटात सामील झाला आहात,आता तिथे तरी वळवळत न राहता प्रामाणिक रहा,कारण खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यांचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आपली खरी कसोटी सच्चाईची सुरू होईल, त्यामुळे उगाच हाच पक्ष खरा तो पक्ष स्वघोषित आहे ही वक्तव्य करताना थोडे भान असूद्या,शेवटी आपण राजकीय भाडेकरुच आहात कितीही आगपाखड केली तरी कुठल्याही पक्षाचे मालक होऊ शकत नाही याची जाणीव ठेवून वक्तव्य करावीत,असे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांनी सांगितले आहे.
आमचीच खरी राष्ट्रवादी असं सांगणे म्हणजे भाडेकरूने मालकाच्या घरावरच हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न- सिंधुदुर्ग युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव











