तहसील कार्यालय परिसरात केलेल्या दंडात्मक कारवाईचे पैसे परत द्या

आ. नितेश राणेंनी आरटीओ अधिकाऱ्यांना भरला दम ; कणकवलीत कारवाईची हिम्मत कशी होते?

कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील गोरगरीब नागरिक आपल्या कामासाठी तहसीलदार कार्यालयात येत असतात. त्या नागरिकांना विनाकारण त्रास देत आरटीओ अधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्याची पद्धत चुकीची आहे. ज्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे, त्यांचे पैसे परत करा असा दम आरटीओ अधिकाऱ्यांना कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी दिला. त्यानंतर कणकवलीत कारवाईची हिंमतब कशी होते? कारवाई करायची असेल तर हायवेवर करा अशा सूचनाही आमदार नितेश राणे यांनी केल्या. कणकवली तहसील कार्यालय परिसरात आलेल्या नागरिकांवर हेरेभेट नसल्याचे कारण दाखवत दंडात्मक कारवाई आरटीओ अधिकाऱ्यांनी केल्याची बातमी आमदार नितेश राणे यांना समजली. त्यांनी थेट कणकवली तहसीलदार कार्यालय धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.

महामार्ग रस्त्यावर कारवाई करायची सोडून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आलेल्या वाहन चालकांवर कारवाई का? अवैध वाहतुकीवर कारवाई हवी, किंवा दुचाकी स्वरांनी हेल्मेट है वापरलेच पाहिजे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयाच्या आवारात येऊन त्रास देण्याची नवीन स्टाईल नको. ज्या आवारात कारवाई करतात त्या तहसीलदारांनाच माहिती नाही. अशा स्थितीत तुम्हाला हे अधिकार कोणी दिले? असे खडेबोल भाजपा आ. नितेश राणे यांनी आरटीओच्या अधिकाऱ्यांना सुनावले.

ज्या वाहनधारकांवर कारवाई केलात, त्यांचे पैसे परत करा. तुम्हाला कारवाईसाठी कणकवलीच मिळते का? असे विचारत आमदार नितेश राणे यांनी आरटीओ काळे यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली. हे काय चालवलात असा सवाल आ. नितेश राणे यांनी केला. संबंधितांना सूचना द्या.
आमदार नितेश राणे यांना आरटीओ अधिकारी श्री. पाटील यांनी आम्ही गेटच्या बाहेर कारवाई करत होतो. असे सांगताच अनेकांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात कारवाई होत होती. गेटच्या बाहेर होत नव्हती असे सांगत फोटो सादर केले. त्यामुळे आरटीओच्या अधिकाऱ्यांचा पोल खोल झाला. आरटीओ अधिकारी श्री. पाटील यांनी मला जर कारवाई थांबवायचे आदेश आलेत आम्ही कारवाई करत नाही असे सांगितले.

त्यावर तुम्ही कारवाई करा, मात्र ती तहसील कार्यालयाच्या आवारात नको. महामार्गावर कारवाई करा. तुमच्या कारवाईत कुणी हस्तक्षेप करणार नाही. यावेळी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी देखील आम्ही यापुढे रस्त्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, भाजप मीडिया प्रमुख समीर प्रभुगावकर, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, भाजप कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यासह आरटीओचे अधिकारी अमित पाटील, श्री. पाटील, श्री. भोसले उपस्थित होते.

error: Content is protected !!