आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
तरेळे (स्वप्नील तांबे) : ओझरम बौद्धवाडी येथे आज ओपन जिमचे शानदार उदघाटन झाले. या प्रसंगी आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलांना शारिरीक बळ मिळावे या हेतूने ओझरम ग्रामपंचायत तर्फे ओपन जिमचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी मिळताच आमदार नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शवत ओपन जिम चा शुभारंभ केला. याच दरम्यान रखडलेल्या विविध कामाचा आढावा आमदारांनी घेतला. रस्त्याचा पाठपुरावा करा मी तुमच्या पाठिशी आहे असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी प्रलंबित असलेल्या रस्त्याविषयी बोलताना सांगितले.
या वेळी सरपंच सौ. समृद्धि राणे,उपसरपंच श्री प्रशांत राणे, सदस्य दिलीप तांबे व इतर सदस्य तसेच पोलिस पाटिल श्री . तुषार तांबे रुपेश राणे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


















