64 लाख 80 हजारांच्या अवैध दारुसह 84 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

एक्साईज भरारी पथक सिंधुदुर्ग ची कारवाई

ओरोस (प्रतिनिधी): नवरात्रोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर एक्साईज ने आपली गस्त वाढविली असून आज पहाटे साडेपाच वाजता ओरोस रवळनाथ मंदिर येथे एक्साईज सिंधुदुर्गच्या च्या फ्लाईंग स्क्वॉड ने 64 लाख 80 हजारांच्या गोवा बनावटीच्या अवैध दारुसह 20 लाख रुपये किमतीचा टेम्पो आणि 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 84 लाख 90 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची टीप मिळाल्यावर एक्साईज चे फ्लाईंग स्क्वॉड ओरोस येथे नशनल हायवेवर वाहन तपासणी करत होते. पहाटे साडेपाच वाजता टेम्पोतून वैद्यकीय रासायनिक पावडर च्या बनावट बिलटी च्या नावाखाली गोवा बनावटीची दारू वाहतूक केली जात असल्याची दिसून आली. या गुन्ह्यात टेम्पो चालक मयूर भगवान चव्हाण ( वय 33, रा.केडगाव रामोशी वस्ती, ता दौंड पुणे ) दिलीप झुंबर चव्हाण ( वय 38, रा. वरवंड , गोपीनाथ नगर, ता दौंड , पुणे ) याना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी , संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानूसार सिंधुदुर्ग अधिक्षक व्ही व्ही वैद्य यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, विशाल सरवटे, चालक जगन चव्हाण, यांनी केली.अधिक तपास दुय्यम निरीक्षक भगत करत आहेत.

error: Content is protected !!