दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

दुर्गामाता मंडळाच्या रौप्य महोत्सवा निमित्ताने ५० रक्तदात्यांचे रक्तदान

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान रक्तदान शिबीरात सहभागी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा करताना आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने वैभववाडीत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात ५० रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या अध्यक्षांसहीत ,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी च्या पदाधिकारी व सदस्यांनी देखील आज रक्तदान करत आपला सहभाग नोंदविला. जीवनधारा ब्लड बॅंक कोल्हापूर यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम रावराणे, दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाताडे, रोटरी क्लब चे अध्यक्ष संजय रावराणे, सचिव प्रशांत गुळेकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे वैभववाडी अध्यक्ष राजेश पडवळ, सदस्य प्रशांत ढवण, नगरपंचायतचे सभापती विवेक रावराणे, रविंद्र तांबे, संतोष रावराणे व जीवनधारा ब्लड बॅंक कोल्हापूर चे कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!