प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे खारेपाटण हायस्कूल मध्ये थेट प्रक्षेपण

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि उच्च माध्यमिक द्विस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रम खारेपाटण या प्रशालेमध्ये कै.प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र या योजने अंतर्गत कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन समारंभ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताची राजधानी दिल्ली येथे नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण खारेपाटण हायस्कूल मधील विद्यार्थ्याना दाखविण्यात आली.

या उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण सुरू होण्यापूर्वी खारेपाटण प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी विद्यार्थ्यांना या कौशल्य विकास केंद्राचे भविष्यातील महत्त्व व कुशल आणि कौशल्य प्राप्त तरुण विद्यार्थ्यांची देशासाठी असलेली आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद कोकाटे सर यांनी केले यावेळी कार्यक्रमासाठी शाळेचे पर्यवेक्षक संतोष राऊत, तंत्र शिक्षण विभागातील ज्येष्ठ शिक्षक महेंद्र चिंगळे,ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विभागाचे शिक्षक सुबोध देसाई, सहायक शिक्षक रामदास कापसे व इतर शिक्षक वृंद आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!