शेर्ले येथे पी एम विश्वकर्मा योजना नोंदणी शिबिर संपन्न

राज्य समन्वय सदस्य आनंद मेस्री, जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश मेस्री यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाड़ी (प्रतिनिधी): सावंतवाड़ी तालुक्यातील शेर्ले गावात विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती आणि सावंतवाड़ी तालुका सुतार समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने पी. एम. विश्वकर्मा योजनेत नाव नोंदनीसाठी नुकतेच शिबिर घेण्यात आले या शिबिरात शेर्ले गावातील बहुसंख्य सुतार समाज बांधवानी लाभ घेतला या प्रसंगी विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय राज्य समिती सदस्य आनंद मेस्त्री, जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, जिल्हा समन्वय समिति मालवण तालुका अध्यक्ष राजू मेस्त्री, सावंतवाड़ी तालुका अध्यक्ष शंकर मेस्त्री, जितेंद्र तिरोडकर आणि शेर्ले गावातील सर्व सुतार बांधव उपस्थित होते. ही सेवा उपलब्ध करुन दिल्या बद्दल शेर्ले गावातील बांधवांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या पुढच्या काळात प्रत्येक तालुक्यातील गावा गावात जाऊन अशा प्रकारची नोंदणी करुन ज्या बांधवाना गरज असेल अशा सर्व जनांची नोंदणी केली जाईल आणि त्यासाठी त्या ठिकाणील बांधवानी सहकार्य करावे असे आवाहन समन्वय समिति मार्फत करण्यात आले.

error: Content is protected !!