भर वस्तीत येऊन दुपारी 3 वाजता बिबट्याने केला शेळीवर प्राण घातक हल्ला

कुर्ली खडकदारा येथील घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

नवलराज काळे यांनी वनपाल लाड यांच्याकडे बिबट्यास जेरबंद करण्याची व शेळी मालक यांना नुकसान भरपाई देणे बाबत केली मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी): येथील कुर्ली खडकदाराचे रहिवाशी रमेश भागू शेळके यांच्या मालकीच्या शेळीवर काल दि.22 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता भर वस्तीत घुसून बिबट्यांनी प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून उपचार चालू आहेत. दुपारच्या वेळेत भर वस्तीत येऊन बिबट्या हल्ला करतो हे कळतात गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. शेळीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांना मिळताच त्यांनी वनपाल श्री लाड यांच्याशी संपर्क करून शेळीवर झालेल्या हल्ल्याचा रितसर पंचनामा करून शेळी मालकाला नुकसान भरपाई मिळण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या तसेच भरवस्ती दुपारचा बिबट्या घुसून शेळीवर हल्ला करतोय. दिवसा ढवळ्या गावात भर वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार असल्यामुळे वाडीमधील ग्रामस्थांवरती मुला बाळांवरती वृद्ध व्यक्ती वरती हल्ला करण्याची शक्यता आहे तरी वेळेत सदर बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाकडून व्हावा अशी देखील मागणी काळे यांनी श्री लाड यांच्याकडे केली. बिबट्याला जेरबंद करण्याबाबत वरिष्ठ लेवल वरून कार्यवाही होते त्याबाबत वरिष्ठांना कळवतो व शेळी मालकाचे जे काही नुकसान झालं असेल त्याचे नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे देखील श्री लाड यांनी श्री काळे यांना भ्रमणध्वनीवरून आश्वासीत केले.

error: Content is protected !!