कणकवली (प्रतिनिधी): माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती ची घोषणा करताच निलेश यांचे कडवट समर्थक असलेले भाजपा कणकवली तालुका युवा मोर्चाचे ग्रामीण चिटणीस विजय इंगळे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विजयादशमी दिवशी माजी खा.निलेश राणे यांनी ट्विट करून आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. सध्या च्या राजकारणात रस नसल्याचे सांगत त्यांनी राजकारणाला च जय महाराष्ट्र केले. निलेश राणे यांच्या निर्णयाचे पडसाद सिंधुदुर्गात उमटू लागले आहेत. कणकवली तालुका भाजपा युवा मोर्चा ग्रामीण चिटणीस विजय इंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटलं आहे की निलेश साहेब तुम्ही आमचे दैवत आहात. तुमच्यामुळे आम्ही राजकारण, समाजकारणात आलो. तुम्ही आमचे आदर्श आहात.माझ्यासारख्या हजारो तरुणांना तुम्ही आपलेसे केलात. तुम्हीच राजकारणात नसाल तर मला कुठल्याच पदाची आस नाही. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत.
साहेब आम्ही सदैव तुमच्याचसोबत .. विजय इंगळे यांचा पक्षपदाचा राजीनामा










