चिंदर येथील जेष्ठ भजनी बुवा यशवंत (बाळू बुवा) घाडी यांचे निधन

आचरा (प्रतिनिधी): चिंदर गावठणवाडी येथील जेष्ठ भजनी बुवा यशवंत शांताराम घाडी उर्फ बाळू बुवा बांदिवडेकर यांचे आज सकाळी रहात्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. चिंदर गावठणवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्या सौ. जान्हवी घाडी यांचे ते सासरे होत. त्यांच्या निधनाने भजन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!