तीन बस आणि ट्रक यांची टक्कर दसरा मेळाव्यावरून गावी परतणाऱ्या शिवसैनिकांचा अपघात

ठाणे (प्रतिनिधी) : शिंदे यांचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाल्यानंतर आपल्या गावी परतत असणाऱ्या शिंदे गटाचे कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला आहे. दसरा मेळाव्यानंतर आपापल्या गावी परतणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचा मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ विचित्र असा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही निर्माण झाली. एक ट्रक आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते प्रवास करत असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपघात झाला. त्यानंतर मागून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इतर दोन बसेसही एकमेकांवर धडकल्या.

ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळल्या तर, इतर दोन बसचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याअपघातामध्ये 6 ते 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर काही कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. मेळाव्यासाठी मुंबईला जात असताना शिवसैनिकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झालेत. कवटेमहाकांळ तालूक्यातून जात असताना रत्नागिरी नागपूर महामार्गावरील शिरढोण गावाजवळ हा अपघात झाला. एका ट्रकने पदाधिकाऱ्यांच्या गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. शिंदे गटाच्या युवासेनेचे पदाधिकारी होते अशी माहिती समोर आली आहे.

error: Content is protected !!