सामंत इलेक्ट्रॉनिक्स चे मालक सतीश उर्फ बंडू सामंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मधलीवाडी येथील रहिवासी तथा सामंत इलेक्ट्रॉनिक्स चे मालक सतीश उर्फ बंडू सामंत ( वय 52 ) यांचे आज दुःखद निधन झाले. मुंबई गोवा महामार्गालगतच्या स्वमालकीच्या सामंत इलेक्ट्रॉनिक्स शो रूम च्या माध्यमातून प्रतिथयश व्यावसायिक म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला होता. हरकुळ (बु.) येथे 3 महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांच्या मेंदूला मोठा मार लागला होता. त्यानंतर त्यांच्यावर गोवा येथील खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.ऑपरेशन नंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू होते. अधिक उपचारासाठी त्यांना अलीकडेच मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.त्यातच त्यांचे आज मध्यरात्री निधन झाले.प्राथमिक शिक्षिका स्नेहा सामंत यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चत पत्नी, मुले, असा परिवार आहे. आज दुपारी 12 वाजता त्यांच्या अंत्ययात्रा मधलीवाडी येथील घराकडून काढण्यात येणार आहे. सामंत यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!