खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून युवतीला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

कणकवली गणपती सान्याजवळच्या घटनेने खळबळ

कणकवली (प्रतिनिधी): एकतर्फी प्रेमातून युवतीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न कणकवली येथे गणपती साना परिसरात घडला. युवकाच्या तावडीतून युवतीला काही नागरिकांनी सोडवून घेतल्यानंतर त्या युवकाने गणपती साना येथे नदीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने कणकवलीत शहरात खळबळ उडाली असून हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले आहे.एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली आहे. आज शनिवारी सकाळी एका कॉलेज युवतीच्या प्रेमात असलेल्या युवकाने तिला फोन लावून संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. पण युवतीने आपल्याला ब्लॉक केले आहे हे लक्षात येताच त्याने तिला जाब विचारला. त्यानंतर गणपती साना परिसरात तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती युवती घाबरली आणि किंचाळली. यावेळी त्या परिसरातील काही लोकांनी सदर युवकाला हे कृत्य करण्यापासून रोखले. त्यामुळे अनर्थ टळला. मात्र, त्या युवकाने पाण्यात उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या हे प्रकरण कणकवली शहरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. पोलीस ठाण्यात याबाबत युवतीने धाव घेतली आहे.

error: Content is protected !!