रिंकू पाटील घटनेची कणकवलीत पुनरावृत्ती टळली

पोलिस पुढे काय करतात याकडे लक्ष

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात युवकाने पेट्रोल टाकून अल्पवयीन युवतीला जाळण्याचा केलेला प्रयत्न स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला . मात्र या घटनेमुळे कणकवली सह सिंधुदुर्गात रिंकू पाटील घटनेची चर्चा सर्वांच्या तोंडी होती. कणकवली शहरात प्रेम प्रकरणातून अल्पवयीन युवतीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यानंतर भाड्याने राहत असलेल्या त्या अल्पवयीन युवती च्या घरमालकाने संबंधित युवक आणि अल्पवयीन युवतीला कणकवली पोलीस ठाण्यात आणले. संबंधित युवक हा सज्ञान असून कणकवली तालुक्यातील गावातील आहे. दोघांचेही नातेवाईक आणि युवकाच्या गावातील काही ग्रामस्थांनी सुद्धा पोलीस ठाणे गाठले. भरदिवसा अल्पवयीन युवतीच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्याच्या या अतिगंभीर घटनेनंतर पोलीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

error: Content is protected !!