आमदार वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा
कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ तालुक्यातील आकेरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गुरुनाथ पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह सरपंच महेश जामदार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करतानाच त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देखील दिल्या. कुडाळ तालुक्यातील आकेरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत गुरुनाथ पेडणेकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी सरपंच महेश जामदार, ग्रामसेवक रश्मी राऊळ, महेश गावडे, मैत्री पालव, सोनल परब, कु. भगत, रुपाली पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गुरुनाथ पेडणेकर म्हणाले आकेरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांसोबत योगदान देण्याचे काम करणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये गावातील बरीच विकास कामे मार्गी लागलेली आहेत. या पुढच्या काळात आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत आपण काम करू असे ते म्हणाले.












