फोंडाघाट येथे सरपंच संजना आग्रे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप

फोंडाघाट(प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने दिपावली साठी पाठविलेला आनंदाचा शिधा फोंडाघाट येथे सरपंच सौ.संजना संजय आग्रे यांच्या हस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख संजयजी आग्रे, सोसायटी चेअरमन राजन नानचे, सोसायटी माजी चेअरमन बबन हळदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभधारकाना करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकार काळात गोरगरीब गरजू जनतेला सणा सुदीच्या तोंडावर अत्यावश्यक असलेले चणाडाळ रवा मैदा, पोहे, तेल साखर जिन्नस देऊन आनंदाने सण साजरा करायला सहकार्य केले आहे.गोरगरीब जनतेच्या मनातील हे शिंदे सरकार असल्याची भावना सरपंच संजना आग्रे यांनी व्यक्त केली. यावेळी सोसायटी संचालक नागेश कोरगावकर, गोसावी , सचिव प्रसाद देसाई, संतोष नारकर, रघुनाथ भिरंवडेकर, विजय बागवे,लाड, अशोक सामंत,प्रकाश हळदिवे, मिलिंद तावडे, सेल्समन सरीता पाटकर, आर्या नानचे, अशोक तावडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!