खारेपाटण गावचे सेवानिवृत्त कोतवाल शांताराम उमाजी राऊत यांचे दुःखद निधन

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील हासोळटेंब – कोंडवाडी येथील रहिवासी तथा खारेपाटण गावच्या तलाठी सजा कार्यालयाचे माजी सेवानिवृत्त कोतवाल शांताराम उमाजी राऊत यांचे नुकतेच रविवार दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. शांताराम उमाजी राऊत हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल अंतर्गत येणाऱ्या खारेपाटण तलाठी सजा कार्यालयात गेली २५ वर्षे कोतवाल या पदावर काम केले होते. १० वर्षापूर्वीच ते या सेवेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात २ मुलगे,२ मुली,पत्नी व नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!