अपघाती वळणावरच बांधकाम सुरू ; स्थानिक प्राधिकरणाची परवानगी नाही
खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे शुक नदीवरील ब्रीज नजिक अवघड अपघाती वळणावरच एक अनधिकृत बांधकाम सुरू असून महामार्ग प्राधिकरणाने याकडे पूर्णतः हा डोळे झाक केली असून सदर बांधकाम राजरोसपणे सुरू आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण येथे राष्ट्रीय मार्गावर सुरू असलेले बांधकाम हे हॉटेल मधुबन च्या समोर तर कोल्हापूर गगनबावडा कडून आलेल्या राज्य मार्ग मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेला आहे.अगदी त्यांच्या समोरील रस्त्याला लागून अवघड वळणावर सुरू असून आज पर्यंत खारेपाटण ब्रीज वरील अवघड वळणावर ३० पेक्षा अधिक छोट्या मोठ्या वाहानांचे अपघात झाले असून अशा संवेदनशील व धोकादायक अपघात पॉइंट ठिकाणी इमारत बांधकाम करणे म्हणजे पुन्हा अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच आहे.
याबाबत अधिक चौकशी केली असता सदर बांधकाम हे वनविभाग सिंधुदुर्ग जिल्हा खारेपाटण तपासणी नाका इमारतीचे असल्याचे समजते.मात्र हेच बांधकाम एखाद्या व्यक्तीने केले असते तर हायवे प्राधिकरण किंवा स्थानिक प्राधिकरणाची लगेच संबधीत व्यक्तीला नोटीस आली असती.मात्र हायवे प्राधिकरनाने जमीन संपादित काय केली ?म्हणून कोणालाच विश्वासात न घेता बेजबाबदारपणे आपल्या अधिकाराचा वापर करीत अनधिकृत बांधकाम करणे कितपत योग्य आहे.असा सवाल आता स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.
स्थानिक प्राधिकरण खारेपाटण म्हणून येथील ग्रामपंचायतीशी संपर्क साधला असता.सदर बांधकामा परवानगी संदर्भात त्यांच्या कार्यालयात कुठल्याही प्रकारचा अर्ज आलेला नाही.असे समजते. तर खारेपाटण येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वनविभागाच्या पक्क्या इमारतीच्या बांधकामाला स्थानिक नागरिकांचा विरोध नसून ज्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ती जागा चुकीची असून या बांधकामामुळे इथे आणखीन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी सदर कामाची चौकशी करण्यात यावी. व तात्काळ थांबविन्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.












