सत्कार सोहळा देवदुताचा

राजेंद्र पेडणेकर यांच्या माऊली मित्रमंडळाने केला देवदुताचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : आज अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे राजु म्हापसेकर, संजय मालंडकर, सुभाष उबाळे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र, कासार्डा येथे कार्यरत असणारे वसंत शंकर राणे यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी राजेंद्र पेडणेकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, रविवार असल्याने या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला कुठे दाखल करावे ? असा प्रश्न निर्माण झाला, काही सुचत नव्हते. त्याच वेळी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे वसंत शंकर राणे त्यांची विचारपुस करत, रुग्णाला कुठे न्यावे याचा सल्ला देत कणकवलीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेऊ आणि स्वतः तेथे हजर राहुन रुग्णावर ताबडतोब उपचारासाठी सर्वतोपरी मदत केली. पुढील ४-५ दिवस फोनव्दारे चौकशीही करत असत. अशा या देवदुताचा सन्मान करताना मला आनंद होत आहे.

कणकवली पोलिस स्थानकात नवीनच कामावर रुजू झालेले पोलीस निरीक्षक अमित आनंदराव यादव यांनी अचानक कार्यक्रम स्थळी उपस्थितीत राहुन वसंत शंकर राणे या देवदुताचा सत्कार केला आणि आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, शासकीय काम करत असताना जे योगदान आहे ते समाजाप्रती जी संधी मला भेटते. पटवर्धन चौकामध्ये एका महिलेचे प्राण वाचवुन सहकार्य कस करता येईल, या पध्दतीने एक नमुना दिलेला आहे. काम करण्याचा आणि सर्व शासकीय अधिकार्यांना हा मैलाचा दगड ठरेल. याचप्रमाणे सर्व शासकीय अधिकारी काम करतील आणि आपले कर्तव्य बजावतील. तसेच समाजाप्रती असलेली जान ठेवतील आणि काम आहे ते करतील. सर्वांना दाखवुन देतील आणि यापुढे सर्व कामासाठी पोलीस प्रशासनाकडुन त्यांना हार्दिक शुभेच्छा.

यावेळी संजय मालंडकर म्हणाले की,आम्हाला वसंत राणे आणि जिल्हा उपरुग्णालयातील डॉक्टर,परिचारिका आणि सर्व कर्मचारी वर्गाचा आम्हाला अभिमान वाटतो.

यावेळी माऊली मित्र मंडळाचे सदस्य, व्यापारी मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते. उपस्थितीत सर्वांनी वसंत राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले आणि शुभेच्छा दिल्या. सुभाष उबाळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!