खारेपाटण (प्रतिनिधी) : सोबती सोशल फौंडेशन आणि जीवन आनंद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दहिसर पश्चिम येथील पदपथावरील रख्खादादा या वस्तीतील बालकांसाठी जानेवारी-२०२१ पासून संगम प्रकल्प चालविला जातो. सोबती सोशल फौंडेशनचे साथी गेली तीन वर्षे नित्यनेमाने दरवर्षी संगम डे केअर सेंटर मधील बालकांसह दिवाळीचा आनंद साजरा करतात.
यंदाही दिपावली लक्ष्मीपूजन व नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला या साथींनी संगम डे केअर सेंटरमधील बालके, स्टाफ सदस्यांना दिवाळीचा फराळ आणि सर्वांसाठीसाठी नवीन कपड्यांचे वितरण करून दिपावलीचा आनंद साजरा केला.दारिद्र्याच्या कारणाने पदपथावरचे वंचितावस्थेतील जीवन जगत असलेल्या कुटुंबामधील बालकांना स्वतःचे जीवन घडविण्याची आणि सु संस्कारांची संधी मिळावी. व त्यांना सकस आहार मिळावा.तसेच त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होवून या बालकांमधून उद्याचे सुजान नागरिक घडावेत या हेतुने तीन वर्षांपुर्वी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब आणि सोबती सोशल फौंडेशनच्या संयुक्त विचार भुमिकेतून संगम प्रकल्पाची निर्मिती झाली. आज संगम डे केअर सेंटर मधे २५ बालके सहभागी आहेत.तर सेंटरमधील विविध उपक्रमांमुळे येथील बालकांचे व्यक्तीमत्व विकसीत होण्यास सहाय्य होत आहे.
या कार्यक्रमाची सुरूवात साने गुरूजींच्या खरा तो एकचि धर्म-जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेने झाली. त्यानंतर बालकांच्या हस्ते सोबती सोशल फौंडेशनच्या मान्यवर पदाधिकारी सदस्यांना बालकांनी तयार केलेली शुभेच्छा पत्रे आणि गुलाब पुष्पे प्रदान करून त्यांचे स्वागत करण्यात आले.बालकांसह दिपावलीचा आनंद साजरा करण्यासाठीच्या या कार्यक्रम प्रसंगी सोबती सोशल फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद सावंत, सचिव महेश बुरटे, खजिनदार दिपक झाडराव ,सदस्य मनोज धोत्रे, अविनाश सर्वेकर, राजु कुलनकर, आदित्य कुलनकर आणि यशवंत साटम यांचेसह जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांची यावेळी उपस्थीती होती.संगम प्रकल्पातील केअर टेकर सुनिता भंडारी, शिक्षिका मिना पटेल, नम्रता ताई, दिपा पाटिल यांची कार्यक्रमाच्या संयोजनात भुमिका राहिली.















