महाराष्ट्रात लवकरच 1500 कोटींचा कोको कोला उद्योग; हजारो तरुणांना नोकरीची संधी

मुंबई (ब्युरो न्यूज) : राज्यातील उद्योग परराज्यात गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक काही महिन्यांपूर्वी सामोरे आले होते. परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याचवेळी विरोधकांमुळेच हे उद्योग राज्याबाहेर गेल्याचे म्हटलं होतं. दुसरीकडे आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. मी उद्योग मंत्री झाल्यानंतर रत्नागिरीजिल्ह्यात प्रथमच पंधराशे कोटी रुपयांचा कोका कोलाचा उद्योग उभारला जात आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. चिपळूण मधील वशिष्टी नदीतील बहादुरशेख नाका ते गोवळकोट येथील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ उदय सामंत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते.

राज्यातील उद्योग परराज्यात गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक काही महिन्यांपूर्वी सामोरे आले होते. परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याचवेळी विरोधकांमुळेच हे उद्योग राज्याबाहेर गेल्याचे म्हटलं होतं. दुसरीकडे आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. मी उद्योग मंत्री झाल्यानंतर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात प्रथमच पंधराशे कोटी रुपयांचा कोका कोलाचा उद्योग उभारला जात आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. चिपळूण मधील वशिष्टी नदीतील बहादुरशेख नाका ते गोवळकोट येथील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ उदय सामंत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते.

error: Content is protected !!