आमदार नितेश राणे यांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा – संदिप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी ): उचलली जीभ लावली टाळ्याला, या उक्ती प्रमाणे , दिवाळीत पाडव्याला ही शिमगाच्या थाटात खासदार व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत याच्यावर बालिशपणाने फुसके बाण सोडून केवळ लोकांचे मनोरंजन करणारे आमचे आमदार यांना बाल दिनाच्या दिवशी सुटलेले हे पेव आहे एवढेच याला म्हणता येईल अशी टीका शिवसेना जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी केली आहे. अयोध्या ला जणू काही आपणच बाबरी मशीद पाडली या रांणाभीम थाटात मोफत ट्रेन सोडण्या पेक्षा त्यांनी गरीबांना आनंद शिधा यावर्षी ही दिवाळीत रेशनिंग वर देण्याकडे लक्ष देणे गरजेचे होते.परंतु काहीतरी बाष्कळ बोलत राहिले तर चिप प्रसिध्दी मिळते व गरजेच्या मुद्द्याला बगल मिळते .हाच यातून उद्देश दिसतो आहे.

error: Content is protected !!