कणकवली (प्रतिनिधी ) : आज 14 नोव्हेंबर.. बालदिन..नॅशनल हायवेवर लेबर काम करणारी मध्यप्रदेश मधील कुटुंबे आपल्या मुलाबाळांसह झोपड्या उभारून ओसरगाव टोलनाक्यावर सध्या राहत आहेत. ओसरगाव चे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी एम पी मधील या कामगारांच्या लहान मुलांसोबत आज बालदिनी दिवाळी साजरी केली.बच्चे कंपनीला दिवाळी फराळ खाऊ वाटप केले. अनपेक्षित दिवाळी भेट मिळाल्यामुळे बच्चेकंपनी च्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.
असाही बालदिन …एम पी मधील कामगारांच्या मुलांना खाऊवाटप












