कणकवली (प्रतिनिधी): पटवर्धन चौक येथे असणारे नगरपंचायत भाजी मार्केटमधील सर्व बंधु आणि भगिनींना, तसेच व्यापारी मित्रंडळींना संजय मालंडकर, महेश काणेकर, सुनिल काणेकर, भाई काणेकर, पी. टी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समस्त व्यापारी वर्गाला राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या आगामी वाढदिवसाचे औचित्य साधत, दिपावली पाडव्याला सर्वांचे तोंड गोड केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना महेश काणेकर असे म्हणाले की, २० जानेवारीला राजेंद्र पेडणेकर यांचा हिरक महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या साठाव्या वाढदिवसाचे औचित्य साधत, सामाजिक दृष्टीकोन जपत, तसेच लहानपणापासुनच तो आम्ही अनुभवला आहे. त्याची प्रचिती आता प्रत्येकाला येत आहेच. दिवाळी निमित्त नगरपंचायतमधील कर्मचारी , सफाई कामगार, तसेच उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, इतर आणि कणकवली पोलीस ठाण्यातील नवीनच रुजु झालेले पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव यांच्यासहित संपुर्ण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना आगामी वाढदिवसाचे औचित्य साधुन दिपावली निमित्ताने सर्वांना भेट वस्तु देऊन तोंड गोड केले आहे. यावेळी नगरपंचायत व्यापारी बंधु आणि भगिनी उपस्थित होत्या. सुभाष उबाळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.











