” त्या ” नेपाळी ला पीएचसी त केले दाखल

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांचा पुढाकार

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेले 3 दिवस हवेली नगर येथे जखमी अवस्थेत असलेल्या सुरेश उपाध्याय या नेपाळी युवकाला अखेर आज सायंकाळी फोंडाघाट दुरक्षेत्र चे पोलीस कर्मचारी आणि फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्र च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.जखमी अवस्थेत असलेल्या सुरेश नेपाळी वर वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला होता.तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ किर्लोस्कर यांच्याशीही मोबाईलवर जखमी सुरेश नेपाळी ची अवस्था कथन केली होती. हवेलीनगर येथील साईबाबा मंदिराच्या बाजूला एसटी बस थांब्यालगत सुरेश जखमी अवस्थेत पडून होता. अम्ब्युलन्स चालक अजित सापळे यांनीही सुरेश नेपाळीला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी मेहनत घेतली.

error: Content is protected !!