कणकवली (प्रतिनिधी) : माऊली मित्रमंडळचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या आगामी हिरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त दिवाळी भेट म्हणून कणकवली शहरातील नगरपंचायत सफाई कामगारांना सन्मान, तसेच डॉक्टर, नर्स पोलीस आदि देवदूतांचा सन्मान उपक्रम कणकवली शहरात माऊली मित्रमंडळाच्या वतीने राबविला जात आहे.राजेंद्र पेडणेकर यांच्या पत्नी ऋणाली पेडणेकर यांनी आपल्या पतीच्या वाढदिवसानिमित्त अनोखी शक्कल लढवून कणकवली शहारातील रिक्षा चालकांना भाऊबीजनिमित्त कणकवली रिक्षा स्टँड नंबर १ , रिक्षा स्टँड नंबर २ आणि आचरा रोड पोस्ट ऑफिस रिक्षा स्टँडला भेट देवून भाऊबीज निमित्त मिठाई वाटप केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर, सादीक कुडाळकर, प्रवाशी संघ कणकवली तालुका सचिव सी.आर.चव्हाण ,भिवा परब,युवराज वाळके, सुभाष उबाळे,सईद नाईक, प्रभाकर कदम,माऊली मित्रमंडळ कार्यकर्ते आणि रिक्षा व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवली शहरातील रिक्षा स्टँड चालकांकडून राजेंद्र पेडणेकर आणि ऋणाली पेडणेकर आणि माऊली मित्रमंडळाचे आभार मानण्यात आले.












