कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा खजिनदार भास्कर राणे आणि कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तालुका समन्वयक सुनील पारकर, कणकवली शहरप्रमुख बाळू पारकर, चिन्मय रावराणे, प्रमोद सांगवेकर, भाई पावसकर आदी उपस्थित होते.













