जगातील सर्वात मोठ्या मैदानावर विश्वचषकाचा महामुकाबला !

टीम इंडिया नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज

अहमदाबाद (ब्युरो न्यूज) : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक 2023 चा महाअंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता पाहायला मिळणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान आहे.

साबरमती नदीच्या काठावर बनवलेले नरेंद्र मोदी स्टेडियमजगातील सर्वात मोठं क्रिकेट मैदान आहे. या मैदानाचे सौंदर्यही पाहण्यासारखं आहे. रविवारी या मैदानावर विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. या अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. या सामन्याआधी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमचा इतिहास आणि त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या.नरेंद्र मोदी स्टेडियम विश्वातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 132000 प्रेक्षक सामना पाहू शकणार आहेत. याआधी ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे जगातील सर्वात मोठे मैदान होते, पण आता या स्टेडियमने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला मागे टाकलं आहे.

अहमदाबादमधील हे स्टेडियम हे मोटेरा स्टेडियम नावानेही ओळखलं जातं. हे मैदान 1982 मध्ये पूर्ण झालं. पण, त्यावेळी मैदानात केवळ 49 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता होती. 2015 साली पंतप्रधान आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी स्टेडियम पुन्हा नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला. 2020 मध्ये स्टेडियम पूर्ण झाले. आता या स्टेडियममध्ये 132000 चाहते सामना पाहू शकतात. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे जगातील सर्वात मोठे मैदान होतं, ज्यावर 90 हजार चाहत्यांना सामना पाहण्यासाठी व्यवस्था होती.

हे मैदान सुमारे 63 एकरमध्ये पसरलेले आहे, याला 4 गेट आहेत. याशिवाय नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 4 ड्रेसिंग रूम आहेत. क्रिकेट स्टेडियममध्ये साधारणपणे दोन ड्रेसिंग रूम असतात. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सरावासाठी 6 इनडोअर खेळपट्ट्या आहेत, तर 3 मैदानी खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत. या स्टेडियममध्ये क्रिकेट अकादमी आहे. या स्टेडियममध्ये चाहत्यांच्या बसण्यासाठी केलेली व्यवस्था उत्तम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!