आचरा (प्रतिनिधी) : पळसंब वरचीवाडी येथील जेष्ठ आणि नवोदित दशावतार कलावंतांचा सत्कार समारंभ अक्षय तृतीयाच्या निमित्ताने बुधवार 30 एप्रिल रोजी पळसंब विठ्ठल रखुमाई मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगावेळी करण्यात आला. मेघ:शाम गोलतकर, कमलेश मेस्त्री, बाळकृष्ण (बाळु) बाणे, एकनाथ साईल, राकेश साईल, तुळशीदास चव्हाण, भक्तेश गोलतकर, हर्षद जाधव, मनोज पराडकर, अनिल परब, विक्रम जाधव, प्रसाद जाधव, पांडुरंग सावंत, गंधार बिर्जे, अविनाश बागवे आदी कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंब वरचीवाडी यांच्यावतीने कै. कृष्णा साईल यांच्या स्मरणार्थ उमेश साईल पुरस्कृत आणि पळसंब गावातील ज्येष्ठ आणि युवा दशावतार कलावंतांचा गौरव यावेळी करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मेघ:श्याम गोलतकर, कार्यवाह मधुकर कदम, पुरुषोत्तम साईल, तुळशीदास चव्हाण, श्यामसुंदर गोलतकर, एकनाथ कुमामेकर, उमेश साईल, दिनेश साईल, सहदेव राऊत, प्रसाद बेनकर, सरपंच महेश वरक, उपसरपंच अविराज परब, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश परब, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश लाड आदी मान्यवर उपस्थित होते.












