मुंबई (ब्यूरो न्युज) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताचा सामना विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध एकूण 8 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर विश्वचषकाच्या इतिहासात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 5 सामने जिंकले आहेत. फायनल सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा कर्दनकाळ ठरू शकतो.
हा खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. बुमराहचे पूर्ण नाव जसप्रीत जसबीर सिंह बुमराह आहे. बुमराहची जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. सध्या बुमराह हा भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज मानला जातो. बुमराहच्या वेगवान यॉर्करसमोर जगातील महान फलंदाजांनी घाम फुटतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा बुमराह हा भारताचा दुसरा गोलंदाज आहे. ‘बूम-बूम बुमराह’ने कसोटी क्रिकेटमध्येही हॅट्ट्रिक घेतली आहे. यासह बुमराहच्या नावावर क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये एका षटकात बॅटने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आहे.