कलमठच्या आरोही मनोज मेस्त्री यांच्या हस्ते कलमठ ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण

डॉ होमीभाभा बालवैज्ञानिक परिक्षेत राज्यस्तरीय सुवर्णपदक प्राप्त केल्याने ग्रामपंचायतने दिला बहुमान

ग्रामपंचायत अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आरोही मेस्त्रीचा केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कलमाड ग्रामपंचायत मध्ये आज डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत राज्यस्तरीय सुवर्णपदक प्राप्त केलेल्या कु आरोही मनोज मेस्त्री या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आरोही मनोज मेस्त्री हिने नातपय एकांकिका स्पर्धेमध्ये स्त्री अभिनय प्रथम क्रमांक, मानवी शरीर ओलंपिक मध्ये द्वितीय क्रमांक, जिल्हास्तरीय सुगम संगीत, देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन येथील चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक, गेल्या वर्षी स्कॉलरशिप स्पर्धेमध्ये तालुक्यात तृतीय व जिल्ह्यामध्ये अकरावी येण्याचा मान, राज्यस्तरीय गणित प्रज्ञाशोध परीक्षा मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी. अश्या विविधांगी गुणांचा गौरव म्हणून आज सरपंच संदिप मेस्त्री यांनी आरोही हिला ध्वजारोहण करण्याचा मान दिला.

सरपंच झाल्यापासून तिसऱ्यांदा आपण गावातील गुणवंत विद्यार्थ्याला ध्वजारोहण करण्याचा मान दिला असून , कलमठ ग्रामपंचायत अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना गावातील विविध क्षेत्रातील गुणवंत, विशेष योगदान व प्राविण्य मिळवलेल्या कलमठकरांचा सन्मान आपण करत आहोत गावातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने दरवर्षी गावातील विविध क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या तसेच गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्याला ध्वजारोहण करण्याचा मान देत आहोत त्याचाच एक भाग म्हणून गावाचे नाव उज्वल करणाऱ्या आरोहिला यावर्षीचा ध्वजारोहणाचा बहुमान दिला आहे असे सरपंच संदिप मेस्त्री यांनी सांगितले.

अभ्यास म्हणजे फक्त पाठ्यपुस्तक नव्हे तर कला,क्रीडा, अभिनय, संगीत विविध अश्या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान अंगीकारणे म्हणजे अभ्यास होय. तसेच आज मला धजारोहणाचा बहुमान मिळाला यामुळे गावातील माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळेल असे यावेळी सरकारला उत्तर देताना आरोही मेस्त्री म्हणाल्या.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य नितीन पवार, दिनेश गोठणकर, सुप्रिया मेस्त्री, अनुप वारंग, स्वाती नारकर, नजराणा शेख, धीरज मेस्त्री, डॉ आराधना मेस्त्री, मनोज मेस्त्री गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!