जिल्ह्याच्या विकासा संदर्भात राणेंसोबत काम करणार; शिक्षण मंत्री दीपक केसरकर

राणे साहेबांचा पूर्वी जसा आदर मी करत होतो तसाच आजही करतो

डीएड बेरोजगारांचा प्रश्न सकारात्मक रित्या सोडवू

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासा संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब आणि मी आम्ही दोघेही एकत्रपणे काम करणार असे यापूर्वीच अनेक वेळा मी जाहीर केलेले आहे. त्यामुळे तुम्हा कोणाच्या मनामध्ये असते तसे आमच्यात काहीच नाही. राणे साहेबांचा पूर्वी जसा आदर मी करत होतो तसाच आजही करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासा संदर्भात ते चांगले मार्गदर्शन करत असतात, लवकरच एकत्र बसून आणखी नवनवीन काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या पद्धतीने करता येईल याची चर्चा आम्ही करणार आहोत. डीएड बेरोजगारांचा प्रश्न आणि त्या संदर्भात आता झालेली चर्चा सकारात्मक रित्या पुढे घेऊन जात डीएड बेरोजगारांना न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन या संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणखीन चर्चा सरकार सोबत करणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा लवकरच सुटेल असा विश्वास शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी मुंबई येथे मी जात असतो. गणपतीत गणेश दर्शनासाठी सुद्धा गेलेलो होतो. जिल्ह्यातील विकास कामा संदर्भातही आम्ही अनेक वेळा चर्चा करतो. भेट सातत्याने होत नसली तरी कोणी गैरसमज करून घेऊ नये, राणे साहेबांबद्दलचा आदर, मान, सन्मान पूर्वीप्रमाणेच आजही आहे. असेही मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

error: Content is protected !!