रेल्वे टर्मिनस सोबत एक्सप्रेस थांबविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू

दीपक केसरकर; वाईट स्वप्ने बघण्यापेक्षा लोकांसाठी काम करा, आदित्यना टोला

सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी येथील रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लागण्या बरोबर एक्सप्रेस गाड्यांना सावंतवाडीत थांबा मिळण्यासाठी यापुर्वीच मी रेल्वे राज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. यात सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. तरी सुध्दा प्रसंगी पुन्हा एकदा भेट घेईन, अशी भूमिका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे मांडली. दरम्यान कोणी कितीही सरकार कोसळणार, असा दावा केला तरी त्यांचे ते दिवा स्वप्नच राहणार आहे. अशा प्रकारचे वाईट स्वप्ने पाहण्यापेक्षा लोकांसाठी काम करा, असे त्यांनी आदित्य ठाकरे यांना नाव न घेता टोला सुनावला.

error: Content is protected !!