दत्ता दळवीं च्या अटकेतून मिंधे सरकारची खदखद बाहेर आली- संदिप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : भांडूप येथे कोकणी मेळाव्याचे आयोजन करणारे श्री. संदीप सरवणकर यांनी, भांडूप पो ठाणे येथे दत्ता दळवी यांचे विरुद्ध रविवारी मेळाव्यातील भाषणात, श्री. एकनाथ शिंदे यांचे वर अश्लील भाष्य केले म्हणून गुन्हा दाखल केला व त्यांना बेकायदेशीर अटक केली या संदर्भात बोलताना , म्हणाले श्री. दत्ता दळवी शी अनेक वेळा दबाव आणून ते, उद्धव साहेबांची साथ सोडत नाही. ह्याची खदखद मुख्यमंत्र्यांचे मनात होती.ती या प्रसंगी “गिरे तो भी हमारी तंगडी उपर ” यास साजेशी अशी राहून बाहेर पडली आणि त्यांनीच नाहक बेकायदेशीर अटक करण्याचा दबाव पोलिसानं वर टाकला असावा हे दिसून आले आहे. कोर्टनी यावर ताशेरे मारत माजी महापौर श्री दत्ता दळवी यांना जामीन दिला. हा सत्याचा विजय असून , जिथे दत्ता तिथे एकनिष्टांची सत्ता ही येणारच” हे ही सांगितले.

error: Content is protected !!