ठेचून मारण्याची, चिखल ओतण्याची राणे भाजपाची संस्कृती

जान्हवी सावंतांच्या पाठीशी ठाकरे सेना उभी

कुडाळ (प्रतिनिधी) : अंगावर चिखल ओतणे, ठेचून मारणे, धिंड काढणे ही भाजपाचीच संस्कृती आहे. ते जिल्ह्यातील लोकांना माहिती आहे त्यामुळे भाजपाच्या संध्या तेरसेंनी आमच्या नेत्यांना धमक्या देवू नये, त्यांच्या पाठिशी पक्ष कायम उभा आहे, असे प्रत्यूत्तर ठाकरे शिवसेनेच्या कुडाळ नगरसेविका श्रेया गवंडे, तालुका संघटक नेहा दळवी, मधुरा राऊळ यांनी भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे यांना दिले आहे.

तुमच्या पक्षाचे नेते आणि त्यांची २ मुले नेमके कोणत्या भाषेत बोलतात याचा अभ्यास करा आणि नेमकी कोणाची संस्कृती चांगली हे तुम्हीच ठरवा, उगाच आमच्या नेत्यांच्या नादी लागू नका, असे त्यांनी म्हटले आहे. काल या ठिकाणी भाजपाच्या जिल्हाध्यक्षा सो तेरसे व अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत जान्हवी सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांची धिंड काढू, असा इशारा दिला होता. याला तिघा महिला पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून प्रत्यूत्तर दिले आहे.

error: Content is protected !!